औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथे हिंदू खाटीक समाजाच्या वतीने खाटीक समाजाचे सत्यशोधक समाजाचे अग्रदूत, डॉ. संतूजी रामजी लाड यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . संतुजी लाड यांच्या प्रतिमेचे पुजन अनिल रावळाकर जिल्हाध्यक्ष औरंगाबाद . गणेश वेल्हाळकर तालुकाध्यक्ष पवन लाड युवा संघटक यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली या प्रसंगी आनिल रावळकर यांनी संतुजी लाड यांच्या काम कार्या विषयी खाटीक समाजाला मोलाचे मार्गदर्शन केले डॉक्टर संतुजी लाड हे एक थोर समाजाचे नेते होते महात्मा ज्योतिबा फुले तसेच महर्षी वाल्मीक रामाजी शिंदे यांच्यासोबत त्यांनी मोलाचे सहकार्य केले असे रावळकर यांनी सांगीतले आणि जय जय संतुजी या घोषवाक्याचा नारा देण्यात आला.यावेळी जयंती कार्यक्रमादरम्यान खाटीक समाजातर्फे पुष्प हार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले डाॕ. लाड यांच्या जयंती कार्यक्रम दरम्यान फर्दापुर येथील उपस्थित शुभम रावळकर,पिंटू लाड, समाधान पवार ,अनिल हिवराळे, प्रवीण मदाने, विलास कल्याणकर, भैय्या पवार, देवा वेल्हाळकर ,मयुरी मदाने, शिवन्या सचिन महाकाळ, व महिला सयाबाई रावळकर ,सुवर्णा वेल्हाळकर, सुवर्णा रावळकर, मिराबाई कल्याणकर, व गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद