पुणे :-
मार्च २०२३ संपण्याअगोदर या हंगामातील ऊस गाळपाचे पेमेंट शेतक-यांच्या खात्यावर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने जमा करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पाचंगे यांनी म्हटले आहे,
कधी काळी हाच घोडगंगा ८ लाख टन ऊसाचे गाळप करत होता. तो या हंगामात जेमतेम ४ लाख ३५ हजार मेट्रिक टनापर्यंत गाळप करू शकला. ६ मार्च २०२३ लाच हंगामाचा शेवट झाला.
दुसरीकडे व्यंकटेश कृपा शुगर मिल्सने ६ लाख पेक्षा जास्त गाळप केल्याची माहिती समोर आली आहे.
दिनांक १६ जानेवारी २०२३ पासूनचे शेतक-यांचे ऊस बील अद्याप कारखान्याने दिलेले नाही. मार्च महिन्यात शेतक-यांना सोसायटी,बँकांची देणी, पीक कर्ज भरावयाची असतात असे निवेदनात म्हटले आहे.
एन टी व्ही न्यूज मराठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे 8975598628
