जुनी पेन्शन योजना आम्हा सर्व नवीन कर्मचा-यांना लागू करावी अशी मागणी शालेय शिक्षक सचिन बेंडभर यांनी केली आहे.
जुनी पेन्शन योजना व सरकारी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी,निमसरकारी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,महापालिका, नगरपालिका,नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले आहेत.जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी गेल्या ३ दिवसांपासून राज्यभर संप सुरू असून सरकारी कर्मचा-यांनी पुणे जिल्हा परिषद नवीन इमारतीपासून घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात शिरूर तालुक्यातील १७०० कर्मचारी मंगळवारपासून सहभागी झाले असून शिरूर पंचायत समितीसमोर धरणे धरल्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर नुकताच मोर्चा काढला.
राज्य सरकारी कर्मचा-यांच्या संपाच्या निमित्ताने मागणी करताना शिक्षक सचिन बेंडभर म्हणाले,आजचा संपाचा,मोर्चाचा
४ था दिवस असून जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना अशी शासनाने जी फूट पाडली ही फूट म्हणता येणार नाही. जुन्या पेन्शनची सुद्धा भरपूर संख्या आजच्या मोर्चात पाहावयास मिळाली. जुनी पेन्शन योजना आम्हा सर्व नवीन कर्मचा-यांना लागू करावी अशी मागणी संप,मोर्चाच्या निमित्ताने शिक्षक सचिन बेंडभर यांनी केली.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे
एन टी व्ही न्यूज मराठी
शिरूर , पुणे
