पुणे :-
महिलांना एस टी च्या सर्व प्रकारच्या बस तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाणार असून दि.१७ मार्चपासून अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन एस टी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एस टी च्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने १७ मार्च २०२३ पासून एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एस टी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणार आहे.
राज्यशासन एस टी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठांना एस टी च्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच ६५ ते ७५ वर्षांच्या जेष्ठांना एस टी च्या सर्व प्रकारच्या बसेसमधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.त्यानूसार या दोन्ही घटकांना एस टी च्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते. सदर सवलतीची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होत आहे असे पत्रकात म्हटले आहे.
एन टी व्ही न्यूज मराठी
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे शिरूर जि.पुणे 8975598628
