बजरंग सेनेचे शिरूर बसस्थानक आगार व्यवस्थापकांना निवेदन
पुणे : बसस्थानकामधील फलकावरील नावे बदलण्यात यावी अशी मागणी शिरूर बजरंग सेनेने शिरूर बसस्थानक आगारव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राजँय सरकार आणि केंद्र सरकारने नुकतेच औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करून छत्रपती संभाजीनगर असे नाव त्या जिल्ह्याला दिले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून त्याला धाराशिव असे नाव दिले आहे. त्यामुळे अखंड हिंदूस्थानमध्ये आनंदाचे वातावरण आहे.परंतू आपल्या बसस्थानकावरील फलकावर अजुनही उस्मानाबाद आणि औरंगाबाद ही नावे तशीच आहेत ही बाब त्या आनंदामध्ये विरजन घालणारी आहे. नामांतर झाल्याऩंतर सर्वत्र त्या जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. आपण पण आपल्या बसस्थानकामधील फलकांवरील नावे बदलून तेथे छत्रपती संभाजीमहाराज नगर आणि धाराशिव ही नावे लावावी अशी आपणास विनंती करतो असे निवेदनात म्हटले आहे.
जर आपण लवकरात लवकर हे फलक दुरूस्त केले नाहीत तर बजरंगसेना शिरूर च्या वतीने तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.