नागपुर जिल्ह्यातील बिना भानेगाव जोड येथील
मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्मोत्सव निमित्त दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ३एप्रिल ला जल प्याऊचे शुभारंभ करण्यात आले, हा जल प्याऊ निरंतर दोन महिने जनतेचा सेवेत सुरु राहिल,बिना गावातून कामठी, खापरखेडा जाने येनारे प्रवासींना तसेच खापरखेडा,कामठी कडे जानार्यांना तपत्या ऊन्हात थोडी विश्रांती व थंड प्याऊचे लाभ मिळेनार आहे, या वेळी भानेगाव चे सरपंच सौ.शालिनीताइ चवरे यांचा हस्ते जल प्याऊचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी उपस्थित प.स.कामठी सभापती दिशाताई चंडकापुरे, भानेगाव उपसरपंच सोनुताई बोरकर, बिना सरपंच नारायणजी भडंग, गंगाधरजी निखाडे,अनेश चवरे, दिलीपजी तांडेकर,सुखदेवजी देऊळकर,संजयजी गोटे, भिवा तांडेकर,शंकर केळवदे, गोपाल तांडेकर सुरेशं रंगारी,शुभम तांडेकर,गणेश खोडे, महादेव पराते,शैलेश नारनवरे, संजय केळवदे,यांची उपस्थितित व आदींनी सहकार्य केले आहे
