खापरखेडा येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची १९६ आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १३३वी जयंती निमित्ताने मानवंदना म्हणून जयंती उत्सव मंडळ व रमाई महिला मंडळ प्रकाश नगर वसाहत औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रज्ञा विकास सार्वजनिक वाचनालय प्रकाश नगर वसाहत येथे दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८ वाजता पासून ते रात्री ८ वाजेपर्यंत सतत १२ तास वाचनाचा उपक्रम राबवून आपल्या महापुरुषास मानवंदना देण्यात आली.

सदर १२ तास सलग वाचन उपक्रमास प्रकाश नगर वसाहत मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. उपरोक्त उपक्रमास ६० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदविला.

यामध्ये इयत्ता १ली ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुला-मुलींनी तसेच मोठ्या संख्येने महिला तथा पुरुष यांनी सहभाग नोंदवून दोन्ही महापुरुषांना मानवंदना देण्यात आली.

उपरोक्त कार्यक्रमाचे उद्घाटन प्रज्ञा विकास सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष यशवंत झोडपे यांनी केले. याप्रसंगी शैलेंद्र मेश्राम, विलास कुमार उके, नितीन काळे, मिलिंद रंगारी, कुलदीप खोब्रागडे, इंदल शामकुंवर, मेघा शामकुंवर, पवन सोमकुवर, शौर्य सोमकुवर, निर्मित काळे, संबोधी सोमकुवर, विनोद बनसोडे, अक्षय सिंदूरकर, निलेश घोडाम आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ व रमाई महिला मंडळाचे पदाधिकारी तथा सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा नागपूर