जिल्हा आदर्श बँक कर्मचारी व गटसचिव संघटनेचा पुढाकार

लातूर

राज्यात अग्रेसर असणाऱ्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा बँक कर्मचारी संघटना व जिल्हा गटसचिव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १५१ जणांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून दिलीपराव देशमुख यांच्या बद्दल असलेल्या आदराची भावना या सामाजिक बांधिलकी म्हणून झालेल्या कार्यक्रमातून बँकेच्या अधिकारी कर्मचारी गटसचिव यांनी दाखवलेली आहे तत्पूर्वी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख अतिथी माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, अँड श्रीपतराव काकडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक पृथ्वीराज सिरसाठ, राजकुमार पाटील, संचालक व्यंकटराव बिरादार, संचालक अनुप शेळके, संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

शून्यातून लातूर बँकेला विश्व निर्माण करण्याचे काम दिलीपराव देशमुख यांनी केले
माजी आमदार वैजनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

यावेळी बोलताना माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी लातूर बँकेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी शून्यातून विश्व निर्माण करणारे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी जी मेहनत घेतली त्यांच्या कार्यामुळे आज शेतकरी सभासद यांना चांगले दिवस बघायला मिळत आहेत. त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभो आरोग्य निरोगी राहावे अशा शुभेछा दिल्या. येणाऱ्या काळात दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक जोमाने जिल्हा बँक आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा बँकेमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला बळ

माजी आमदार अँड त्रिंबक भिसे यांचे मत

लातूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला लोकनेते विलासराव देशमुख यांनी सुरवात केली त्यानंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या मदतीने सहकार चळवळीला उभारी देत जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम लातूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे आज त्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी म्हणून बँक दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करते हा उपक्रम अतिशय चांगला आहे यामुळे एखाद्या गरजू रुग्णाला जीवदान देण्याचे काम या माध्यमातून होते असे उपक्रम अधिकपने राबवण्याची गरज आहे असे सांगून त्यांना वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन करून उपस्थित जिल्हा आदर्श बँक कर्मचारी संघटना व गटसचिव यांचे कौतुक केले.

यावेळी यशवंतराव पाटील यांनी लातूर जिल्हा बँक एकेकाळी आर्थिक संकटात असताना बँकेने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सक्षम नेतृत्वाने आर्थिक संकटातून बाहेर काढले त्यासाठी त्यांनी स्वतःफील्ड वर जावून मेहणत घेतली बँकेच्या अधिकारी कर्मचारी कर्जदार यांच्यात समन्वय करून कर्ज वसुली केल्याने बँक आज चांगल्या टॉप ५ मध्ये अग्रस्थानी आहे. वेगवेगळ्या योजनेतून ग्रामीण भागातील लोकांना न्याय देवुन त्यांना आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच मदतीची भावना ठेवल्याने बँकेची आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे भविष्यात चांगले कार्य करेल असा विश्वास व्यक्त करून दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या.

रीड लातूर यासंस्थेस ब्लड बँकेकडून पुस्तकतुला भेट

माऊली ब्लड बँकेच्या वतीने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने कार्यक्रमात पुस्तकतुला करून ती सामजिक कार्य करणाऱ्या रीड लातूर या संस्थेच्या अध्यक्षा सौ दीपशिखा देशमुख ,मार्गदर्शक आमदार धीरज देशमुख यांच्या संस्थेस डॉ उमाकांत जाधव यांच्या हस्ते भेट देण्यात आले. यावेळी मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख, विलास साखर कारखान्याचे संचालक गोविंद डुरे पाटील, जिल्हा महीला काँग्रेस च्या सौ सुनीता आरळीकर, दयानंद बिडवे, बँकेचे सरव्यवस्थापक सी एन उगिले, उपसरव्यवस्थापक बी व्ही पवार, जिल्हा आदर्श बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोविंद कोळपे सह त्यांचे पदाधिकारी, गटसचिव संघटनेचे अध्यक्ष धोंडिराम पौळ व पदाधिकारी बँक ऑफीसर अधिकारी कर्मचारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी तर सूत्रसंचलन व्हि सी बिरादार यांनी आभार प्रदर्शन बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ यांनी मानले.

प्रतिनिधी मोमीन हारून
एन टीव्ही न्युज मराठी लातूर
9822699888 / 9850347529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *