अहमदनगर : अफसाना शौकत तांबोळी (मुलीची आई) वय 48 रा. साकुर ता. संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीनुसार

अफसाना शौकत तांबोळी व शौकत सुलेमान तांबोळी, मुलगा सरफराज शौकत तांबोळी असे कुटुंब राहत असुन अफसाना तांबोळी व त्यांचे पती शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. त्यांना दोन मुली असुन मोठ्या मुलीचे नाव तैसिन शाहरुख तांबोळी व लहान मुलीचे नाव तन्जिला अल्ताब शेख असे असुन त्यांच्या मोठ्या मुलीचे सासर शेवगाव येथे असुन लहान मुलीचे सासर लोणी येथील आहे. त्यांची लहान मुलगी तन्जिला अल्ताब शेख ( तांबोळी) हीचे सुमारे 19 वर्षे वय असुन तिचे मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे दिनांक 04/12/2022 रोजी साकुर गावात अल्ताब गुलाब शेख ( तांबोळी ) रा. शांतीनगर लोणी खुर्दे ता. राहाता याच्याशी लग्न केले होते. लग्नावेळी तन्जिला हीचे पती, सासरे, भाया, जाऊ व परविन गुलाब तांबोळी ननंद यांनी दोन तोळे मागितले होते मात्र आमची परिस्थीती नसल्याने माझे पती यांनी त्यांना एक तोळा दिला होता, व तिचे लग्न झाल्यानंतर ती तिच्या सासरी लोणी येथे राहत होती तिथे तिच्या सासरी तिचे पती अल्ताब गुलाब ताबोंळी (शेख), सासरे गुलाब ताबोळी, भाया सलिम गुलाब ताबोंळी, जेठाणी इरशाद सलिम तांबोळी व ननद परविन गुलाब तांबोळी असे एकत्र राहत होते. तिला एकूण पाच ननंदा असुन बाकी या त्यांच्या त्यांच्या सासरी राहतात. त्यानंतर लग्नानंतर माझी मुलगी प्रेग्नेंट असल्याचे तिने सांगितले व त्यामुळे काम होत नसल्याचे तसेच वारंवार उलट्या होत असल्याने तिचे पती अल्ताब गुलाब ताबोंळी (शेख), सासरे गुलाब ताबोळी, भाया सलिम गुलाब ताबोळी, जेठाणी इरशाद सलिम तांबोळी व ननंद परविन गुलाब ताबोळी असे तिला तु काम करत नाही सारखा खर्च तुझ्यावर चालु आहे असे म्हणुन टोचून बोलून तिला मानसीक टॉर्चर करत असल्याचे व तुला प्रेगनेंट काळातील खर्च घरून आणावा लागेल व लग्नात राहीलेला एक तोळा माहेराहुन घेवुन ये नाहीतर हा त्रास सुरु राहील असे मुलगी रमजान ईद महीण्यात माहेरी आल्यावर तिने आईला व वडलांना सांगितले होते. त्यानंतर अफसाणा तांबोळी (मुलीची आई) ईदच्या एप्रील महीण्यात मुलीची ननंद शबाना तांबोळी हीची डिलीवरी झालेली असल्याने तिला भेटण्यासाठी राहाता येथ आले होते. तेथे देखील मला माझ्या मुलीची ननंद परविन गुलाब तांबोळी ही म्हणाली होती की, तन्जिला ही काहीएक काम करत नाही, तिला काम जमत नाही त्यावर मी ती प्रेग्नेंट असल्याने तिला त्रास होतो असे बोलले होते मात्र तीने काही एक एकुन घेतले नाही.

त्यानंतर दिनांक 17/05/2023 रोजी दुपारी 01.00 ते 01.30 वाजण्याचे सुमारास मुलीचे सासरे गुलाब तांबोळी (शेख) यांचा मोबाईलवर फोन आला व त्यांनी सांगितले की, तन्जिला हीने घरात फाशी घेतली आहे असे सांगितले त्यामुळे मुलीचे सर्व नातेवाईक दुपारी सुमारे 02.30 वाजण्याचे सुमारास लोणी येथेपोहचले तेव्हा माझी मुलगी ही प्रवरा हॉस्पीटल लोणी येथे दाखल असल्याचे सर्व नातेवाईकांना समजल्याने त्यांनी प्रवरा हॉस्पीटल लोणी येथे जावून पाहीले असता मुलगी ही मयत झालेली होती. त्यानंतर लोणी पोलीस स्टेशन येथील पोलीस तेथे येवुन त्यांनी मुलीचा पंचनामा केला व त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर पोस्ट मार्टम केले व मयत मुलीची बॉडी पुढील तजविज करण्यासाठी नातेवाईकांना दिली, तरी मुलगी तन्जिला अल्ताब शेख वय 19 वर्षे रा. शांतीनगर लोणी खुर्दे ता. राहाता जिल्हा अहमदगनर हीला तिचे पती अल्लाब गुलाब साबोळी (शेख), सासरे गुलाब ताबोळी, भाया सलिम गुलाब ताबोळी, जेठाणी इरशाद सलिम तांबोळी व ननद परविन गुलाब ताबोळी सर्व रा. लोणी ता. राहाता यांनी लग्नावेळी दोन तोळ्यांची मागणी केली व राहीलेल्या एक तोळ्यासाठी व प्रेगनेंट काळातील खर्च घरून आणण्यासाठी तिला तुला काम होत नसल्याने व तु काम करत नाही सारखा खर्च तुझ्यावर चालु आहे असे म्हणून टोचून बोलून तिला मानसीक टॉर्चर केल्याने त्या त्रासाला कंटाळून तिने दिनांक 17/05/2023 रोजी दुपारी सुमारास राहते घरातील छताच्या असलेल्या लोखंडी हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली असुन तिच्या आत्महत्येस मुलीची सासरवडी जबाबदार असल्याचे मुलीच्या नातेवाईकांचे आरोप आहे.

मिळालेल्या माहितनुसार या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असून आरोपी अल्ताब गुलाब शेख रा. लोणी याला अटक करण्यात आली असून बाकी आरोपी फरार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *