क्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे मानले विशेष आभार

हमदनगर प्रतिनिधी(दि.१६ मे) :-
कोतवाली पोलिसांनी हरवलेले तसेच चोरीला गेलेले महागडे मोबाईल मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी २ महिने विशेष मोहीम राबवून तांत्रिक कौशल्यावर तपास करत चोरी गेलेले मोबाईल हस्तगत केले.

१ लाख ४४ हजार ९०० रुपये किमतीचे मोबाईल तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परत केले आहेत.मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला,की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते.मात्र,कोतवाली पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत.