अहमदनगर : ज्ञानसरिता विद्या प्रसारक संस्थेचे ज्ञानसरिता विद्यालय वडगाव गुप्ता या शाळेचा तब्बल २० वर्षांनंतर सन २००३ ची जुनी एस.एस. सी बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेच्या प्रांगणात पार पडला. काहींनी यावेळी शालेय जीवनातील आठवणीना सर्वांनी उजाळा दिला काहींनी आपल्या आनंदाश्रुंना वाट मोकळी करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्येचे अध्यक्ष मा. श्री जालींदर पा. डोंगरे हे होते
आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून चाळीशी कडे झुकलेले हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले त्यांच्या चेहयावर आनंद ओसांडून वाहत होता. अनेक वर्षानंतर आपण एकत्र भेटत आहोत, त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावनाही होतीच; पण एकत्र आले आणि सर्वानीच गला भेट घेतली.
कार्यक्रमासाठी शाळेचे सर्व आजी माजी शिक्षक हजर राहिले होते. शाळेचे माजी श्री. डोंगरे रेसर व श्री ठाणगे सर व विद्यमान मुख्यध्यापक श्री सानप सर सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. व तसेच समाजाची दशा व दिशा यावर प्रकाश टाकत समाजासाठी थोडा तरी वेळ प्रत्येकाने द्यावा असे मत व्यक्त केले
कार्यक्रमाचे आयोजन श्री अमोल बोडखे श्री शिवाजी वामन श्री पवन मोरे श्री गणेश दहातोंडे श्री विवेक ठोकळ श्री मनोज डोंगरे श्री किशोर बोरुडे श्री अमोल दाभाडे श्री सागर ससे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री जयदीप अष्टीकर यांनी केले व श्री विवेक पाटेकर यांनी आभार मानले