निस्वार्थ समाजसेवेचे जालिंदर बोरुडे यांचे कार्य प्रेरणादायी – जेष्ठ नेते यशवंतराव गडाख


अहमदनगर – फिनिक्स फौंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे यांनी आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य उभे केले आहे. हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. अनेक गरजू-गरीबांना मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करुन हजारो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम त्यांनी केले आहे. वृद्ध, गरजूंच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम त्यांनी केले आहे. आज राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने ‘आदर्श नेत्रदूत पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरवच केला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांना नुकताच राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती, नवी दिल्ली या संस्थेच्या वतीने ‘आदर्श नेत्रदूत पुरस्कार देवुन गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळल्याबद्दल जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ नेते श्री.गडाख बोलत होते. यावेळी जेष्ठ कवी तथा महाराष्ट्र साहित्य परिषदचे चंद्रकांतजी पालवे, जेष्ठ साहितिका व अंबिका महिला बँकेच्या संस्थापिका मेधाताई काळे, हस्यसम्राट डॉ. संजय कळमकर , प्रा.गणेश भगत आदि उपस्थित होते.
जेष्ठ कवी चंद्रकांतजी पालवे म्हणाले कि, गेल्या 35 वर्षांपासून सामाजिक, आरोग्य क्षेत्रात काम करतांना गरजू-गरीब रुग्णांना सेवा देऊन त्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्याचे काम जालिंदर बोरुडे करत आहेत. त्यामुळे आज अनेक वंचित, गरजु, दिनदुबळ्या घटकांना त्यांच्या या कार्यातून मोठा आधार मिळत आहे.
यावेळी जेष्ठ साहितिका मेधाताई काळे व हस्यसम्राट डॉ.संजय कळमकर यांनी आपल्या मनोगतातून जालिंदर बोरुडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन भविष्यातही त्यांच्या हातून असेच दिनदुबळ्यांना आधार देण्याचे काम व्हावे, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *