उमरगा: चिंचकोट येथील माजी सरपंच महादेवी शंकरराव सगर (८७ ) यांचे अल्पशा आजाराने उमरगा येथे दि.२५ रोजी दुःखद निधन झाले. पं. स.उमरगा येथे मुख्यग्रामसेवीका म्हणून अनेक वर्ष सेवा देवुन त्या सेवानिवृत झाल्या होत्या.
उमरगा विधीज्ञ मंडळाचे. माजी अध्यक्ष ॲड. दिलीप शंकरराव सगर यांच्या त्या आई होत्या. स्मृतीशेष कॉम्रेड विठ्ठलराव सगर यांच्या त्या जेष्ठ भगीनी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा अंत्यविधी उमरगा येथील हुतात्मा स्मारक वैकुंठधाम येथे दि.२६ रोजी सकाळी ११ .०० वा. संपन्न झाला.यावेळी माजी खा. रवींद्र गायकवाड, माजी जि.प. उपाध्यक्ष बाबा पाटील, कॉंग्रेस चे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे, कृ. उ. बा. समीती सभापती रणधीर पवार ,प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, राजू सगर, प्रा.कीरण सगर, रत्नकांत सगर, संतोष सगर यांच्या सह मोठ्या संखेने चिंचकोट व परीसरातील नागरीक उपस्थित होते.
