section and everything up until
* * @package Newsup */?> फर्दापुर येथे गोरसेना तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन.करण्यात आले | Ntv News Marathi

औरंगाबाद

राजपूत भामटा बोगस प्रमाणपत्राची घुसखोरी थांबविण्यासाठी गोरसेना आक्रमक. सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथे औरंगाबाद __ जळगाव महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
विमुक्त जातीच्या प्रवर्गातील राजपूत भामटा या मुळ जातीचे बोगस प्रमाणपत्र काढून बिगर मागास जातीतील लोकांनी सामाजिक आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष विविध शासकीय नोकऱ्या व शैक्षणिक जागेवर अतिक्रमण करुन संपूर्ण विमुक्त जातीच्या प्रवर्गातील लोकांवर अन्याय सुरु केला असून त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गोरबंजारा समाजातील अग्रगण्य संघटना गोरसेना दि.१९ जून २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता रस्त्यावर उतरून फर्दापुर येथे रास्ता रोको आंदोलन केले.


विमुक्त जातीच्या संवर्गात राजपूत भामटा ही एक जमात असून बिगर मागास राजपूत जातीतील लोकं भामटा हे शब्द जातीपुढे लावून राजपूत भामटाचे शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यात नुकसान करत आहे. यासंदर्भात गोरसेनेनी दि.२२ जुलै २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील ३०० ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले होते.त्यानंतर दि.११ मे २०२२ रोजी याच मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा सुद्धा काढला होता, तरीही राजपूत भामटा या जातीच्या नावाने बोगस प्रमाणपत्र काढून बिगर मागास जातीतील लोकांनी शासकीय नोकऱ्या व शैक्षणिक ठिकाणी घुसखोरी सुरुच ठेवली आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी गोरसेनेकडुन संपुर्ण महाराष्ट्रात जिल्हास्तरीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.


सदरील आंदोलन सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथे जळगाव- औरंगाबाद या महामार्गावर तोंडापुर फाटा या समोर करण्यात आले.
दरवर्षी राजपूत भामटाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन हजारो जागा MBSS, UPSC,MPSC ,BAMS,BDS,BAMS ,ENGINEERING अशा विविध परीक्षेमध्ये वि.जा.अ. प्रवर्गात घुसखोरी करुन मागासवर्गीयाची जागा लाटलेल्या आहेत.असे असतांना शिंदे फडणवीस सरकारने भामटा हा शब्दच काढण्यासाठी हालचाली सुरु केल्याने भविष्यात राजपूत भामटा व विमुक्त जातीचे आरक्षण पूर्णतः धोक्यात येणार आहे. म्हणून शासनाने सदर शब्द कोणत्याही परिस्थितीत हटवू नये ,बिगर मागास नामसाधर्म्य असलेल्या जातींनी गैरफायदा घेऊ नये यासाठीं बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी असे बोगस प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, राजपूत भामटाचे बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावे, जातवैधता पडताळणी समितीवर विमुक्त जातीचे प्रतिनिधी घ्यावे,१९३१ च्या जनगणने प्रमाणे व १९६१ च्या थाडे कमिशनच्या शिफारशीनुसार ज्या गावात व्हि.जा.अ प्रवर्गातील मूळ राजपूत भामटा वास्तव्याला होते त्या गावाच्या नावाची जातनिहाय यादी दरवर्षी प्रदर्शित करण्यात यावी, राजपूत भामटा मधील भामटा शब्द वगळू नये आदी मागण्यासाठी गोरसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून भटक्या विमुक्त जातीच्या हजारो लोकांनी या आंदोलनात सहभागी होत रविंद्र जाधव गोरसेना शहर अध्यक्ष, विजय राठोड गोरसेना तालुका सचिव,विनोद जाधव गोरसेना तालुका अध्यक्ष, नामदेव राठोड तालुका उपाध्यक्ष, यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या गोरसैनिकाच्या उपस्थिती मध्ये घोषणाबाजी करुन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शासन-प्रशासनाने जर या प्रकरणात गांभीर्याने पावले उचलुन सदरील खुसघोरी थांबवली नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात गोरसेनेच्या वतीने लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी कार्यालयास घेराव टाकुन जाब विचारला जाईल,या वेळी जी परिस्थिती उदभवेल त्यास संपुर्ण पणे शासन आणि प्रशासन जबाबदार राहील असा इशारा गोरसेनेचे शहर अध्यक्ष रविंद्र जाधव, डाॅ.अरुण राठोड (प्रभारी संयोजक) यांनी दिला आहे. यावेळी मोर्चा मध्ये कैलास राठोड,संतोष राठोड, नंदलाल चव्हाण, बाबुराव चव्हाण ठेकेदार,प्रविण जाधव,पृथ्वीराज चव्हाण, सुनिल राठोड, यासह शेकटो कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार सोयगाव आणि फर्दापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांना निवेदन देण्यात आले. अशी माहिती रविंद्र जाधव यांनी दिली

प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *