वाशिम:- NDRF पुणे,SDRF नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ,वाशिम व तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कारंजा अंतर्गत एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन पूर, भूकंप या संदर्भात प्रशिक्षण संपन्न.
दिनांक २० जून २०२३ रोजी NDRF पुणे,SDRF नागपूर,जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम, तहसील कार्यालय कारंजा अंतर्गत एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजन अडाण प्रकल्प, कारंजा येथे आयोजित करण्यात आले होत.एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारंजा तहसीलदार श्री कुणाल झालटे सर, तर प्रमुख मार्गदर्शक NDRF पुणे निरीक्षक श्री आर.जे.यादव,


Sdrf नागपूर निरीक्षक श्री विश्वास बादल, कारंजा पोलीस निरीक्षक श्री नागेश मोहोड,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,नायब तहसीलदार श्रीमती सविता डांगे,ASI श्री मोरे, आगार व्यवस्थापक श्री मोरे, श्री बोंदर, श्री उसेंडी, सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे श्री श्याम सवाई, संत गाडगे बाबा शोध व बचाव पथक प्रमुख श्री दिपक सदाफळे, एन एस एस शोध व बचाव पथकाचे श्री आदित्य इंगोले यावेळी उपस्थिती होती.सर्व मान्यवरांचे स्वागत करून पुढील प्रशिक्षणाला सुरवात करण्यात आली.आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मार्गदर्शनातून सांगितले की पुर , विज पडली, भूकंप,हवामान बदलामुळे विविध आपत्तींचा आपल्याला सामना करावा लागत आहे. त्यासाठी ग्रामस्तरावर समुदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन केले जाते.त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक ndrf निरीक्षक श्री यादव यांनी प्रशिक्षण देताना सांगितले की, मानवी जीवनातील येणाऱ्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करून त्याची नियोजन व व्यवस्थापन केली जाते. अचानक आलेल्या आपत्तीचा सामना करीत आपण त्यावरती प्रथम उपचार कसा केला पाहिजे.

पूर, भूकंप,हार्ट अटॅक,रोड एक्सीडेंट, सर्पदंश त्सुनामी, आग, वीज, एखादा व्यक्ती पुरात, तलावात,विहिरीमध्ये पडला असेल तर त्याला बाहेर कसे काढले पाहिजे आणि त्याला प्रथम उपचार कशा पद्धतीने दिला पाहिजे अशा अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. Sdrf निरीक्षक श्री बादल,श्री दिपक सदाफळे, श्री श्याम सवाई यांनी मनोगत व्यक्त केले.NDRF टीम पुणे यांनी बोट ने शोध व बचाव कसा करावा.याचे बोट प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच साहित्याची माहिती दिली.समारोपीय कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी कारंजा श्री ललिकुमार वऱ्हाडे सर यांनी सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम व तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कारंजा यांच्या वतीने आयोजित केलेल्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तहसील कार्यालय कारंजा, मंगरूळपीर, मानोरा येथील विविध विभागाचे आधिकरी ,कर्मचारी, नदी काठच्या गावाचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, स्वयंसेवी संस्था सर्वधर्म आपत्कालीन, संत गाडगे बाबा शोध व बचाव पथक पिंजर, श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय शोध व बचाव पथक स्वयंसेवक, पट्टीचे पोहणारे व्यक्ती यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रम हा मा.शन्मुगराजन सर जिल्हाधिकारी,वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. मा निवासी उपजिल्हाधिकारी आदरणीय श्री कैलास देवरे सर सर यांचे सूचनेनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाहू भगत यांनी केले व आभार प्रदर्शन शाहू भगत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतसाठी तहसील कार्यालय कारंजा येथील मंडळ अधिकारी श्री कटके, अव्वल कारकून श्री सरोदे, तलाठी श्री राठोड, श्री खिराडे, श्री कांबळे व तहसील कार्यालय अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

आपत्ती व्यवस्थापनाचे उद्देश
१. स्थानिक लोकांत आपत्तीशी सुनियोजित लढा देण्याची संस्कृती निर्माण करणे.

२. आपत्ती पूर्व नियोजन हा संस्कृतीचा एक भाग आहे. हे स्थानिकांच्या मनात बिंबवणे.
३. आपत्ती तयारीचा स्तर उंचावणे.
४. धोका व वाईट परस्थितीचे योग्य विश्लेषण करून आपत्ती प्रसंगातील जीवित व वित्त हानी कमीत कमी स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करणे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *