वाशिम :- समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. सोशल मिडिया माध्यमांचा दुरुपयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व घटना घडल्यापासून फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यात मंगरूळपीर पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
पो.स्टे.मंगरूळपीर येथे अप.क्र.२०६/२३ कलम २९५ अ सहकलम ६७ (अ) IT Act सहकलम ३(१)(V) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपीने त्याच्या Whatsapp वर सामाजिक तेढ निर्माण होईल असे स्टेटस ठेवले होते व सदर आरोपी हा घटना घडली त्यादिवसापासून (०२ महिन्यांपासून) फरार होता. पो.स्टे.मंगरूळपीरचे पोलीस पथक सतत त्याच्या मागावर होते. सदर आरोपी हा त्याच्या घरी येणार असल्याची खात्रीलायक माहिती गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाल्याने पोलीस पथकाने सापळा रचून आरोपी नामे किशोर लांडकर, रा.मोझरी, ता.मंगरूळपीर, जि.वाशिम यास ताब्यात घेतले. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा चार्ज मंगरूळपीर श्री.जगदीश पांडे हे करत आहेत.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जगदीश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.सुधाकर आडे, सपोनि.निलेश शेंबडे, पोउपनि.संतोष आघाव, पोहेकॉ.अमोल मुंदे, पोकॉ.राम राऊत, मंगेश गादेकर, मोहम्मद परसूवाले, विठ्ठल उगले, बबन अंभोरे यांनी पार पाडली.
‘नागरिकांनी सोशल मिडीयाचा गैरवापर टाळावा अन्यथा सामाजिक शांतता बिघडवू पाहणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये व तसे अफवा पसरविणारे किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश पुढे फॉरवर्ड करू नये.’ असे आवाहन मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी जनतेस केले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206