वाशिम :- स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार करून त्या कमाईवर उपजीविका करणाऱ्या ०३ आरोपींविरुद्ध PITA Act अन्वये कारवाई करत ०२ प्रकरणांमध्ये ०२ पीडितांची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे.वाशिम ग्रामीणच्या पथकाला यश प्राप्त झाले आहे.
वाशिम शहरातील आल्हाडा प्लॉट येथे एक महिला तिच्या राहत्या घरात स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार करून त्या कमाईवर उपजीविका करत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सदर महिलेच्या घरी बनावट ग्राहक पाठविला. सदर महिला स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार करत असल्याची खात्री झाल्याने पंचासमक्ष झडती घेतली असता ०१ पिडीत युवतीसह ३१,१५०/-रुपयांचा मुद्देमाल सापडला. सदर युवतीची सुटका करत त्या महिलेविरुद्ध पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.५१९/२३ कलम ३७० (अ)(१) भादंवि सह कलम ३, ४ (१), ५, ७ (अ) स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यामध्ये ०२ आरोपी अटकेत असून पुढील तपास सुरु आहे.


तर दुसऱ्या कारवाईमध्ये पो.स्टे.वाशिम ग्रामीण हद्दीतील सुंदर वाटिका परिसरात एक महिलेने वेश्या व्यवसायाकरिता काही महिलांना आणलेले असून त्या महिलांच्या अनैतिक व्यापारावर सदर महिला उपजीविका करत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यावरून पो.स्टे.वाशिम ग्रामीणच्या पथकाने सदर ठिकाणी पंचासमक्ष कारवाई करत एक पिडीतेची सुटका केली व ३९०५/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणी त्या महिलेवर पो.स्टे.वाशिम ग्रामीण येथे अप.क्र.२८६/२३ कलम ३७० (अ)(१) भादंवि सह कलम ३, ४ (१), ५, ७ (अ) स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यामध्ये ०१ आरोपी अटकेत असून पुढील तपास सुरु आहे.


सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह(IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, मार्गदर्शनाखाली पो.नि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.विजय जाधव, सपोनि.अजिनाथ मोरे, पोहवा.गजानन अवगळे, दीपक सोनावणे, पोना.अमोल इंगोले, प्रशांत राजगुरू, प्रवीण राऊत, राजेश राठोड, राम नागूलकर, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, महेश वानखेडे, पोशि.शुभम चौधरी, अविनाश वाढे, दीपक घुगे, विठ्ठल महाले, मपोहवा.तहेमिना शेख, सुषमा तोडकर, मपोशि.तेजस्विनी खोडके सर्व नेमणूक स्था.गु.शा., वाशिम व पो.स्टे.वाशिम ग्रामीणचे पथक सपोनि.प्रमोद इंगळे, पोहवा.संदीप गायकवाड, पोना.आशिष पाठक, पोशि.योगेश इंगळे, मपोशि.मीनाक्षी गोटे, शशिकला व्यवहारे यांनी पार पाडली.
वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, त्यांना त्याच्या परिसरात काही संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ DIAL 112 वर संपर्क करून पोलिसांना सूचित करावे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *