section and everything up until
* * @package Newsup */?> माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री आमदार हरिभाऊ बागडे (नाना ) यांचा पंचायत समितीत ठिया | Ntv News Marathi



शासन आपल्या दारी योजनेसाठी शेतकरी हितासाठी आमदार पंचायत समितीच्या दारी

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री पंचायत समिती येथे माजी विधान सभा अध्यक्ष व विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे नाना यांनी बिडीओ सह अधिकाऱ्यांची झाडा झडती घेऊन फाईली मंजुर होईपर्यंत येथुन हलणार नाही अशी भुमिका घेत अनेक तास पंचायत समिती कार्यालयात ठिया दिला .

मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यात २४ जुन रोजी शासन आपल्या दारी या शासकीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . मात्र या योजनेसाठी सर्व सामान्य लाभार्थी यांना विविध योजनेच्या मंजुरी देण्यात आलेले पत्राचे वाटप करण्यात येणार आहेत . मात्र गाय गोठा , महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या मंजुर विहीरी हया लाभार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागत आहे . मात्र पैसे दिल्या शिवाय कामे होत नाही . व अनेकांच्या फाईली गहाळ होतात अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा अनुभव व आरोप असल्यामुळे सदर प्रकारची दखल घेऊन आमदार हरिभाऊ बागडे यांनी २२ जुन रोजी दुपारी २ वाजेपासून जो पर्यंत शेतकऱ्यांच्या फाईली प्रस्ताव मंजुर करण्यात येत नाही तोपर्यंत येथुन हलणार नाही असा पवित्रा घेतला . यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह गट विकास अधिकारी यांची तारांबळ उडाली . रात्री उशीरा आमदार पंचायत समितीच्या सभागृहात थांबुन होते . अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली होती . यावेळी फुलंब्री नगराध्यक्ष तथा भाजपा तालुकाध्यक्ष सुहास सिरसाठ जि प सदस्य शिवाजी पाथ्रीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *