उमरगा प्रतिनिधी
आम आदमी पक्षाचे उमरगा तालुकाध्यक्ष राजेंद्र चुंगे आणि उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष डॉ कासले यांच्या प्रमुख उपास्थितीत शासकीय विश्रामग्रहात दि 26 रोजी संपन्न बैठकित पक्षवाढी अनुषंगाने नवीन कार्यकरणी जाहीर करून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी आम आदमी उमरगा तालुका उपाध्यक्षपदी बालाजी धोत्रे, शहराध्यक्षपदी रुपेश लोकरे आणि शहर सचिव पदी दुर्गा धोत्रे यांनी निवड करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री चुंगे यांच्यासह डॉ कासले आणि उमरगा तालुका सचिव उमाकांत मंगरुळे व कार्यकर्ते उपस्थिती होते