मुख्य लोकअभिरक्षक ॲड.अमोल गुंड

बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत पीसीपीएनडीटीची कार्यशाळा उत्साहात

गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व लिंगनिदान बाबत व बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयातील सीएचओ सभागृहात जिल्ह्यातील डॉक्टरांच्या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संयुक्त विद्यमाने आज 27 जुलै रोजी करण्यात आले.

बेटा बेटी, एक समान”: हा आपला मंत्र असला पाहिजे. “आपण मुलीच्या जन्माचे स्वागत करुया आणि मुलीचा जन्म झाल्याचे स्वागत करताना 5 झाडे लावा असे आवाहन
मुख्य लोकअभिरक्षक ॲड.अमोल गुंड, यांच्यावतीने करण्यात आले..
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठस्तर न्यायाधीश वसंत यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे-पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा डोमकुंडवार, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, आयएमएच्या डॉ.स्मिता गवळी, फॉक्सी संघटनेच्या अध्यक्षा डॉ.ललिता स्वामी, वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ, NIMA अध्यक्ष डॉ.गोविंद पाकले, मुख्य लोकअभिरक्षक ॲड.अमोल गुंड, जिल्हा सरकारी वकील ॲड.जयंत देशमुख, डॉ.दत्तात्रय खुने आणि जिल्ह्यातील संबंधित डॉक्टर्स उपस्थित होते.
गर्भलिंग निदान किंवा स्त्री भ्रूणाचे गर्भपात होत असेल तर याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे संपर्क करुन याबाबत माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. दिलेल्या माहितीवर आठ तासाच्या आत कार्यवाही केली जाईल. तेंव्हा या घृणास्पद कृतीस आळा घालण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण आणि पीसीपीएनडीटी समितीस सहकार्य करावे, जिल्ह्यात एमटीपी किट व गर्भपातच्या औषधी सर्रास विकल्या जात आहेत याबाबत आयएमए व एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलावी व पीसीपीएनडीटी ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठस्तर न्यायाधीश वसंत यादव यांनी केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे प्रास्ताविकात म्हणाले की, जिल्ह्यातील गर्भलिंग निदान पूर्व परीक्षण समिती (पीसीपीएनडीटी) गेली अनेक वर्ष सजग आणि सतर्क राहून काम करत आहे. जिल्ह्यात लिंग गुणोत्तर वाढवावा यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तसेच याविषयी वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिध्दी करण्यात येत आहे. तथापि, जिल्ह्यातील रेडिओलॉजिस्ट आणि गायनकलॉजिस्ट डॉक्टरांनीही याबाबत खबरदारी घेऊन गर्भलिंग पूर्व निदान करु इच्छिणाऱ्या माता व त्यांच्या परिवारांचे समुपदेशन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अधिष्ठाता डॉ.शिल्पा डोमकुंडवार, डॉ.सचिन देशमुख, डॉ.दत्तात्रय खुने आणि ॲड.अमोल गुंड यांनीही समायोचित मार्गदर्शन केले.

प्रतिनिधी आयुब शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *