सचिन बिद्री:उमरगा
सकल धनगर समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करण्याची मागणी यशवंत सेनेच्या वतीने करण्यात आली. यासंबंधी मंगळवारी दि.१२ रोजी तहसीलदार गोविंद येरमे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हणले आहे की, सोलापूर येथे धनगर समाजातील युवक संतोष बांगळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन
भंडारा लावत असताना मंत्र्यांच्या
कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणाची चौकशी करून विखे पाटलांचा राजीनामा घ्या व मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करा.सदर मागण्या २२ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा अन्यथा महाराष्ट्र यशवंत सेना व सकल धनगर समाज उमरगा तालुका यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र यशवंत सेनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख दिनेश किरमिडे,जालिंदर सोनटक्के, विलास दूधभाते, लक्ष्मण
बनसोडे, अप्पाराव सोनटक्के, गुंडू घोडके,बालाजी गुड्डे, ओमप्रकाश गावडे, पृथ्वीराज व्हनाळे, धनराज घोडके, विनायक घोडके,सुमन घोडके, कालिंदा घोडके, शामल सोनटक्के, विजया सोनकाटे, वर्षा व्हनाळे आदी
उपस्थित होते.