सन १९६९ ते २०२३ या ५४ वर्षातील हजारो माजी विद्यार्थ्याची उपस्थिती

(सचिन बिद्री :धाराशिव)

पारंपरिक शिक्षणाला व्यावसायीक आधुनिक शिक्षणाची जोड आवश्यक – आ. सतीश चव्हाण

उमरगा : श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय बलसुर येथे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत संस्थेच्या स्थापने पासुन मागील ५४ वर्षातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन दि. १६ रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव आप्पा बिराजदार तर प्रमुख पाहुणे म्हणून पदवीधर आ. सतीश चव्हाण ,संस्थेचे सचिव प्रा.सुरेश दाजी बिराजदार उपस्थिती होती.


यावेळी बोलताना आ. सतीश चव्हाण म्हणाले की, संस्थेच्या ५० वर्षाच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी जीवन आवश्यक कौशल्य प्राप्त करून देशाच्या कानाकोपर्यंत विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. पारंपरिक शिक्षणाला व्यावसायीक शिक्षणाची जोड आवश्यक आहे. कै. आ.भाऊसाहेब बिराजदार त्यांच्यानंतर सचिव सुरेश बिराजदार व बिराजदार कुटुंबीयांनी घेतलेल्या अविरत परिश्रमाचे ही संस्था फलित आहे .प्रा.बिराजदार म्हणाले की, राष्ट्राची यशस्वीता शिक्षणावर अवलंबून असून, संस्थेतुन आतापर्यंत ४५ क्लास वन अधिकारी ,५५ डॉक्टर,१५० अभियंता,२०० शिक्षक,४८ प्रगतशील शेतकरी, आणि हजारो विविध क्षेत्रातील यशस्वी व्यवसायीक, शासकीय नोकरदार ,उद्योजक विद्यार्थी निर्माण झाले आहेत. यापुढेही शिक्षणाचा दर्जा सतत उंचावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत.

अध्यक्षीय समोरापात श्नी. माणिकराव बिराजदार यांनी संस्थेच्या उभारणी काळातील आठवणी सांगितल्या . सेवानिवृत्त प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा आणि जनरल रजिस्टर वरील पहिला प्रवेश प्राप्त विद्यार्थी व राष्ट्रीय , राज्य पातळी वरील खेळाडू आणि विविध क्षेत्रात नेत्रदीपक कार्य करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी प्रगतशील शेतकरी प्रताप मोहिते, उपप्राचार्य अनिल माळी,सुनील सांळुखे, सतीश पाटील, लेखक शेषराव मोहिते, कवी अंजली गुंजोटे,धीरज घोटाळे, माधव नागराळे, पोलीस अधिकारी चरणसिंह राजपूत, अशोक वाकडे, सुरेश बिराजदार, आदींनी मनोगत व्यक्त केली.२००३च्या बँचच्या वतीने डिजिटल क्लास रुम यावेळी तयार करून दिली. तर माजी विद्यार्थी नेताजी साठे यांनी शैक्षणिक उपक्रमासाठी एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि धीरज घोटाळे यांनी पंधरा हजार रुपये दिली. माजी विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक गोविंदराव सांळुखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.परमेश्वर सूर्यवंशी व बळीराम नांगरे यांनी तर आभार साहेबराव पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या सर्व शाखेतील मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्नम घेतले. गावातील व परिसरातील दोन हजार माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *