section and everything up until
* * @package Newsup */?> चंद्रपूर : कराटे क्लब मूल येथे बेल्ट ग्रेडिंग परीक्षा संपन्न | Ntv News Marathi

मुल (सतीश आकुलवार)

उच्च दर्जाचे कराटे खेळाडू घडविणे हेच क्लब चे लक्ष्य: इम्रान खान,मुख्य प्रशिक्षक,कराटे क्लब मूल

चंद्रपूर : रविवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी मूल येथील कराटे क्लब मध्ये एकूण 43 कराटे खेळाडूंनी कलर बेल्ट ग्रेडिंग ची परीक्षा दिली. ज्यात 23 येल्लो बेल्ट, 6 ऑरेंज, 4 ग्रीन, 3 ब्लू, 3 पर्पल, 1 ब्राउन आणि 3 ब्लॅक बेल्ट चे परीक्षार्थी होते. यावेळी मुख्य परीक्षक म्हणून नॅशनल शोतोकान कराटे-डो अससोसिएशन चे महाराष्ट्र राज्य प्रमुख सेन्सेई विनय बोढे सर तर अन्य परिक्षकांत सेन्सेई कपिल मसराम सर व सेन्सेई मूहाफीज सिद्दीकी सर हे होते.कराटे क्लब मूल मध्ये आता मुख्य प्रशिक्षक सेन्सेई इम्रान खान सह तब्बल 7 ब्लॅक बेल्ट खेळाडू आहेत. ज्यामूळे आता अन्य खेळाडू घडविण्यास मोठा प्रशिक्षक वर्ग कार्यरत असेल.

सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी बरीच मेहनत घेतली होती तसेच क्लब मध्ये त्यांना मूल तालुका मुख्य प्रशिक्षक इम्रान खान सर, मूल शहर मुख्य प्रशिक्षक निलेश गेडाम सर, क्लब चे सहप्रशिक्षक सुमेध पेंदोर,साक्षी गुरनुले,अमान पठाण,हर्ष रोहनकर, हर्षल याल्लेवार यांचे मार्गदर्शन लाभले, उत्तीर्ण सर्व खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय यांच्या आई-वडील व कराटे क्लब मूल च्या प्रशिक्षकांना दिले तर नेहमीच मूल तालुक्याला प्रत्येक स्तरावरचे कराटे खेळाडू देणाऱ्या कराटे क्लब मूल चे लक्ष्य हे उच्च दर्जाचे कराटे खेळाडू घडविणे हाच असेल असे तालुका मुख्य प्रशिक्षकाने म्हटले व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *