वनशहीद स्मारक समिती आलापल्ली च्या वतीने स्व खर्चातून निर्माण करण्यात आलेल्या आलापल्ली येथील वन हुतात्मा स्मारकाचे उदघाटन भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिप अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार, अहेरी विधानसभा चे आमदार धर्मरावबाबा आत्राम प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर प्रधान मुख्यवनसंरक्षक एम श्रीनिवास राव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच विनोद आकनपल्लीवार, चंद्रपूर चे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण, गडचिरोली चे वनसंरक्षक डॉ किशोर मानकर, सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमित कुमार, आलापल्ली चे उपवनसंरक्षक सी.आर तांबे, भामरागड चे उपवनसंरक्षक आशिष पांडे, आलपल्ली व अहेरी चे सरपंच उपस्थित होते.
Skip to content