जामखेड प्रतिनिधी नंदु परदेशी
दि 30 मार्च
जामखेड तालुक्यात बहुतांश भागात तिव्र पाणी टंचाई झाली असून पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असुन शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला असून आम्हाला पाणी देता का कुणी पाणी असा सर्व स्त्रुत सुर येत असल्याचे पहावयास मिळत आहे त्यातच तालुक्यातील महत्वाचे समजले जाणारे नान्नज गाव तिव्र पाणी टंचाईच्या झळा भोगत असतानाच नान्नज ग्रामपंचायत प्रशासन व महिला सरपंच प्रतिभा अभिमन्यु मोहळकर यांच्या वतीने शासनाकडे टॅकरची मागणी करण्यात आली असून परिसरातील काही विहीरी व कुपनलीका अधिग्रहित करून जनतेला प्रतिकुल परिस्थीती का होत नाही जेमतेम पाणी पुरवठा करण्याचा चांगला प्रयत्न केला जात आहे त्यातच प्रत्येक प्रभागा साठी आधिग्रहीत केलेल्या पाणी साठ्यातुन नागरीक आपली पाण्याची दैनिक गरज भागवत आहे तर नान्नज येथील इंदिरा नगर परिसरातील कुंडलीक पादरे यांच्या घरगुती कुपनलिकेस शासनाने अधिग्रहीत केले आहे याच कुपनली केतुन या परिसरातील हजारो नागरीक आपली जेम तेम पाण्याची गरज भागवत आहेत तर स्वता बोअर मालक कुंडलीक पादरे हे जातीने लक्ष घालून परिसरातील गोरगरीब नागरीकांना निपक्ष पाती पणाने रोज पाणी पुरवठा करून एक पुण्य कर्म करत असल्याने इंदिरा नगर परिसरातील नागरीक समाधान व्यक्त करत आहेत

त्यातच प्रशासनाने पाण्याची टंचाई लक्षांत घेऊन गरज असणाऱ्या सर्व गावांना त्वरीत टॅकर व्दारे पाणी पुरवठा करावा अशी सर्व स्थरातुन मागणी होत आहे मात्र राजकारणी सद्या लोकसभेच्या निवडणुकीतच व्यस्त आहेत त्यामुळे जन सामान्यांच्या या प्रश्नाला न्याय मिळेल की नाही हा प्रश्न गुलदस्त्यातच असून तालुक्यातील नागरीकांना मात्र रोज पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे त्यामुळे या टंचाई काळात प्रशासनाने त्वरीत योग्य उपाय योजना करून नागरीकांचा पाणी प्रश्न मिटवावा हिच एक माफक अपेक्षा
प्रतिनिधी नंदु परदेशी जामखेड अ नगर मो न 9765886124