( मनोहर तावरे मोरगाव )

मोरगाव ता बारामती येथे विद्युत वितरण कंपनी कार्यालयात नुकतीच काही वेळापूर्वी घडलेली ही गंभीर घटना समोर आलीय. एका अज्ञात दुचाकी वरून आलेल्या व्यक्तीने येथील उपस्थित महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघाटन हल्ला केलाय. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. यातील जखमी महिला कर्मचारी रिंकू बनसोडे यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.

 मोरगाव - जेजुरी या जिल्हा मार्गालगत शासकीय विश्रामगृह शेजारी महावितरण विभागाचे हे कार्यालय आहे. काही वेळापूर्वी या कार्यालयात कामकाज करत असलेल्या महिला वायरमन रिंकू बनसोडे यांच्यावर या ठिकाणी आलेल्या अज्ञात दुचाकी स्वार याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले. 

  या कार्यालयाला लागूनच असलेल्या सबस्टेशन ठिकाणी कामकाज करणारे तंत्रज्ञ कर्मचारी मीटरचे रीडिंग घेण्यासाठी सब स्टेशनच्या आवारात काम करत होते यावेळी यांना या कार्यालयातून ओरडल्याचा आवाज आल्याने त्यांनी या कार्यालयाकडे धाव घेतली. यावेळी या महिला कर्मचाऱ्यावर अज्ञात व्यक्तीने प्राण घातक हल्ला केल्याने त्या जखमी झाल्याचे निदर्शनास आले.

या परिसरात अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या प्राणघात खाल्ल्याने भीतीचे सावट आहे. सुपा पोलिस ठाण्याला याबाबत माहिती देण्यात आली असून, पोलीस घटनास्थळाकडे मार्गस्थ झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *