शिरूर अनंतपाळ ( अजीम मुल्ला )
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील हजरत गैबीसाहब उरूसानिमित्त शुक्रवार दिनांक 3 मे 2024 रोजी भव्य यात्रेचे आयोजन साकोळ ग्रामपंचायत कार्यालयांकडून तसेच दर्गा कमेटीच्या वतीने करण्यात येणार आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील हजरत गैबीसाहब दर्गाह पंचक्रोशीत प्रसिद्ध असून येथे गेल्या अनेक वर्षांपासून हजरत गैबीसाहबांच्या यात्रेचे आयोजन करण्यात येते.
येथे शुक्रवारी सकाळ पासून संध्याकाळपर्यंत यात्रा महोत्सव मोठया उत्साहात साजरी करण्यात येथे.
साकोळच्या पुर्व बाजूस असलेल्या माळमाथ्यावर प्राचीन काळापासून वसलेल्या हजरत गैबीसाहब दर्गाह उरूसानिमित्त भव्य यात्रामोहत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दिनांक 2 मे 2024 ते 3 मे 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
दिनांक 2 मे 2024 वार गुरुवार रोजी सायंकाळी 6 वाजता संदल ( मिरवणूक) पुजारी ताजखाँ तैमुरखाॅ पठाण यांच्या घरापासून निघेल.
तर दिनांक 3 मे 2024 रोजी वार शुक्रवारी सकाळी हजरत गैबीसाहब दर्गाह येथे पुजा पाठ व चादर चढवून यात्रामोहत्सवाची सुरूवात होईल.
साकोळ गावच्या पुर्व बाजूस माळमाथ्यावर असलेले हजरत गैबीसाहब दर्गाह व पश्चिम बाजूस माळमाथ्यावर असलेले हजरत मोहदीनसाहब दर्गाह हे दोघे भाऊ होते. गावातील व पंचक्रोशीतील अबाल वृध्द सर्व धर्मीय मोठया श्रध्देने व भक्तिभावाने दर्शन घेत असतात.
येथील शेतकरी या दोन्ही म्हणजेच हजरत गैबीसाहब दर्गाह व मोहदीनसाहब दर्गाह यांना नैवेद्येच्या रूपात आपल्या शेतातील धान्यांच्या राशी देत असतात. या राशीमुळे शेतक-यांच्या मनोकामना पूर्ण होउन त्याना बळ येते असे येथील वयोवृद्ध सांगत असतात.
या यात्रामोहत्सवासाठी
साकोळ व परिसरातील देवणी, जवळगा, धनगर वाडी, वाघनाळ वाडी, अंकुलगा राणी, घुग्गी, सांगवी, बाकली, बिबराळ, उजेड, हिप्पळगाव, कळमगांव तसेच उदगीर तालुक्यातील सय्यदपूर, करडखेल, देवर्जन आदींसह तालुक्यातील नागरिक मोठ्याप्रमाणात उपस्थित राहातात.
या यात्रा महोत्सवानिमित्त हजरत गैबीसाहब दर्गाह कमिटीचे ताजखाँ पठाण, मुनवरखाॅ पठाण, जब्बारखाॅ पठाण, फेरोजखाॅ पठाण, हबीब पठाण, अनवरखाॅ पठाण, सलमानखाॅ पठाण, सोहेलखाॅ पठाण, इस्लामखाॅ पठाण , मकसुद चिटणीसे, महेबुब चपरासी, अजीम मुल्ला, अहमद बागवान, अनंत डोंगरे, व्यंकट रावळे, यशवंत पाटील, सतिश भिक्का, आदींसह गावातील नागरिकांनी यात्रेत येण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.