वाशिम – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाभरात वस्त्रदान अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गोरगरीब वस्तीमध्ये तसेच पालावर राहणार्या गरजूंना वस्त्रदान केल्या जाते.
यानुसार, गुरुवार, २ मे रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शहरातील शेलू रस्त्यालगत पाल करुन राहणार्या गरजु व गरीब नागरीकांना वस्त्रदान करुन हे अभियान राबविण्यात आले. तसेच यावेळी बिस्कीटाचे सुध्दा वाटप करण्यात आले.
या अभियानांतर्गत गरजू लोकांना मदत करणे ही आजची मानवी गरज आहे याचे उद्बोधन करण्यात आले. या अभियानाला प्रमुख उपस्थिती गुट्टे, राजस्थान आर्य महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. रचना पचोरी मॅडम व अॅडव्होकेट श्वेताताई खंडेलवाल, अभाविपचे जिल्हा सहसंयोजक विजया मोरे ह्या उपस्थित होत्या.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206