मुळ वेतन आणी आस्थापना मंगरूळपीरला आणी तरीही अडिच वर्षापासून मुजरा वाशिमला
सिईओ साहेब गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना पञ लिहिले मग तिन वर्षापासून शिक्षण विस्तार अधिकार्यांचे कार्यालयाला दर्शन नाही त्यांना कधी लिहीता पञ?
मुळ आस्थापनेत जर कर्तव्य पार पाडत नसतील तर शिक्षण खोळंबा होणारच ना!
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात तिन बिटसाठी तिन शिक्षण विस्तार अधिकारी आहेत त्यापैकी एकाकडे गटशिक्षणाधिकार्यांचा प्रभार तर दुसरा तब्बल अडिच वर्षापेक्षाही जास्त कालावधीपासुन मंगरूळपीर कार्यालयाला दर्शनच न दिल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा सूरु असल्याची शिक्षणप्रेमीत दबक्या आवाजात चर्चा सूरू आहे.सदर शिक्षण विस्तार अधिकार्यांकडे वाशिमचा ऊपशिक्षणाधिकार्यांचा प्रभार असल्याने मुळ आस्थापनेत फिरकुनही पाहत नसल्याचे बोलल्या जात असल्याने त्या बिटची शिक्षणस्थीती दयनिय असल्याचे चीञ आहे.सध्या एकच शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत असल्याने आता जि.प.चे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यपालन अधिकार्यांनी सदर अधिकार्याला मूळ आस्थापनेवर हजर राहण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी जोर धरत आहे.
सध्या जिल्ह्यात विकासाचे वारे वाहतांना दिसत आहेत अशातच नव्यानेच जिल्ह्याला लाभलेले कर्तव्यदक्ष जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे (आयएएस)शिक्षण यंञणाही सज्ज ठेवून शिक्षणाची गुणवस्ता वाढावी यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु केलेले आहेत.शिक्षक मुख्याध्यापकांना पञ लिहून गुणवत्ता वाढीसाठी काय करायला हवे याची पंचसुञी सांगीतली आहे.हे असले तरी शिक्षण विभागात काही ढिसाळ आणी वेळकाढू अधिकारी कर्मचार्यामुळे शिक्षणविकास खरच होईल का याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.मंगरूळपीरची तर शिक्षणविभागाची सध्या दयनिय अवस्था पाहायला मिळत आहे.मंगरूळपीर येथील शिक्षण विभाग कित्येक दिवसापासुन प्रभार्याच्यांच खांद्यावर असल्याने शिक्षण विभाग व शिक्षकांवर वचक राहिला नाही पर्यायाने गुणवत्ता ढासळत असुन पालकांचा त्यामुळे खाजगी शाळांकडे कल वाढला आहे.
मंगरूळपीर तालुक्यात जिल्हापरिषदेच्या एकुन ११७ शाळा आहेत.या शाळांवर ३८२ शिक्षक कार्यरत असुन ११ मुख्याध्यापक व ११ केंद्रामध्ये केवळ ५ केंद्रप्रमुख कर्तव्य बजावत आहेत.या तालुक्यात तिन विस्तार अधिकारी नियूक्त आहेत त्यापैकी एका विस्तार अधिकार्यांकडेच गटशिक्षणाधिकार्यांचा प्रभार असुन दुसरे तर तब्बल अडिच वर्षापासुन या कार्यालयाकडे फिरकलेच नसल्याचे वास्तववादी चिञ आहे.सदर विस्तार अधिकार्याकडे वाशिमचा ऊपशिक्षणाधिकार्याॅचा प्रभार असल्याने महाशय मूळ आस्थापनेतील नियूक्ती आणी कर्तव्य विसरल्याने अडिच वर्षाचा कालावधी ऊलटुनही मंगरुळपीर पं.स.च्या शिक्षण विभागातील विस्तार अधिकार्यांचे कार्य आलबेल दिसते.सदर अधिकार्यांचे वेतन मुळ आस्थापनेतुन होते पण साहेब मुजरा वाशिमला करतात मग सांगा शिक्षणाचा विकास कसा होईल? असा प्रश्न शिक्षणप्रेमी विचारत आहेत.सिईओ वैभव वाघमारे हे जि.प.च्या मूख्यकार्यकारी अधिकारी पदावर रुजु होवून अनेक सूधारणा केल्या आणी सर्वांना कर्तव्य बजावण्यासाठी सूतासारखे सरळही केले मग हे अडिच वर्षापासुन मुळ कर्तव्याकडे पाठ फिरवणारे कसे सूटले असा प्रश्न निर्माण होत आहे.सिईओ साहेबांनी आतातरी लक्ष घालून मंगरुळपीरची कोलमडलेली शिक्षणअवस्था दुरूस्तीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206