तिन वर्षापुर्वी मंगरूळपीर पंचायत समीतीत झाला होता प्रतिनियुक्ती रद्द करण्याचा ठराव
पं.स.च्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाला वरिष्ठाकडुन केराची टोपली
वाशिम :- माहे जुलै २०२१ रोजी मंगरुळपीर पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेल्या ठरावानुसार येथील कर्मचारी आणी अधिकारी हे अन्य ठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलेले होते त्यानुसार इतर कर्मचार्यांवर कामांचा ताण पडत असल्याचे निदर्शनात आल्यामुळे सदर कर्मचारी,अधिकारी यांची प्रतिनियुक्ती रद्द करुन मुळ ठिकाणी रुजु करावेत यासाठी सर्वानुमते ठराव घेतला होता परंतु सदर ठरावाला तब्बल तिन वर्षे ऊलटुनही योग्य ती कार्यवाही नसल्याने व प्रतिनियुक्तीवर पाठवलेले अधिकारी अजुनही मुळ आस्थापनेकडे फिरकले नसल्याने या ठरावाला केराची टोपली तर दाखवली नाही ना?असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत असुन विशिष्ट अधिकार्यांनाच कसे प्रतिनियुक्तीवर पाठवले हा प्रश्नसुध्दा पडत असुन त्या अधिकार्यांवर वरिष्ठांनी एवढी मेहेरनजर का?याबाबत ऊलटसुलट चर्चा होत आहे.
प्रतिनियुक्ती म्हणजे एखाद्या कर्मचार्याचे त्यांच्या पालक संस्थेतुन विशिष्ट कालावधीसाठी दुसर्या संस्थेत तात्पुरते हस्तांतरण होय.मंगरुळपीर येथील अधिकारी यांची प्रतिनियुक्तीवर इतर ठिकाणचा प्रभार देण्यात आला होता परंतु तिन वर्षे ऊलटुनही सबंधित अधिकारी तिथेच ठाण मांडुन बसलेले असल्याने मुळ आस्थापनेचे कर्तव्य जैसे थे च असल्याने प्रशासकीय कामांचा खोळंबा होत आहे.प्रशासकीय कामांच्या सोईसाठी अधिकारी कर्मचारी यांची प्रतिनियुक्तीवर अन्यस्ञ प्रभार देवुन कामकाजात सुविधा व्हावी अशी सोय केल्या जाते.परंतु मिळालेल्या माहीतीनुसार मंगरुळपीर पंचायत समितीमधील काही अधिकारी,कर्मचार्यांची प्रतिनियुक्तीवर वाशिमचा प्रभार दिला होता.सदर प्रतिनियुक्तीवर सहा महिने एवढ्या कालावधीसाठी पाठवण्यात येते पण सदर ठिकाणी अजुन कालावधीसाठी कर्मचार्यांची,अधिकार्यांची आवश्यकता असल्यास हा कालावधी सहा सहा महिने याप्रमाणे वाढवता येतो पण त्यासाठी विभागिय आयुक्तांची परवानगी आवश्यक असते.असे असतांना तिन वर्षापासुन प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकार्यांनी या बाबींची पुर्तता केली का? आणी जर वरिष्ठांची परवानगीची पुर्तता केलि असेल तर मुळ आस्थापनेतील कर्तव्याकडे एवढ्या कालावधीपासुन डोळेझाक करता येते का?वाशिम जिल्ह्यात जवळपास पंधरा ते सोळा विस्तार अधिकारी असुनही विशिष्ट विस्तार अधिकार्यालाच कसे एवढ्या वर्षापासुन प्रतिनियुक्तीवर पाठवले? म्हणजे इतर अधिकारी त्या लायक नव्हते का?या बाबीही मुख्यकार्यपालन अधिकार्यांनी तपासणे गरजेचे बनले आहे.प्रतिनियुक्तीवरील अधिकार्यांनी मुळ आस्थापनेची जबाबदारी सांभाळुनच दिलेला प्रभार बघायचा असतो हा सरकारी नियम आहे मग तिन वर्षापासुन मंगरुळपीरच्या ‘त्या’ प्रतिनियुक्तीवर पाठवलेल्या अधिकार्यांनी मुळ आस्थापना सांभाळली का?याचाही शोध घेणे गरजेचे आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206