वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था नांदावी व अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा राबवत सतत कारवाया सुरु असतात. काहीजण छुप्या पद्धतीने अवैध धंदे करण्याचा प्रयत्न करतात अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांनी दिले आहेत.
त्या अनुषंगाने दि.०७.०५.२०२४ रोजी मा.पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS) यांना गोपनीय बातमीदाराकडून मेडशी शेतशिवारातील संत्र्याच्या मळ्यात असलेल्या बंद घरात राजस्थान रॉयल्स विरुद्ध डेल्ही कॅपीटल्स या संघांच्या टी – २० या IPL क्रिकेट सामन्यावर फोनद्वारे सट्टा घेऊन पैश्यांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळवीत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुषंगाने मा.पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पंचांसमक्ष धाड टाकून ०५ आरोपितांकडून ४,३२,९४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेडशी शेतशिवारातील शेख रज्जाक शेख चांद यांच्या संत्र्याच्या मळ्यात असलेल्या बंद घरात आरोपी १) आकाश संतोष रावत, वय २६ वर्षे, २) ललित संतोष रावत, वय २४ वर्षे, ३) शेख समीर शेख कलीम, वय १९ वर्षे, ४) कृष्णा धनराज चव्हाण, वय २५ वर्षे व ५) पांडुरंग सदाशिव मांडवगडे, वय ३७ वर्षे सर्व रा.मेडशी, ता.मालेगाव, जि.वाशिम हे राजस्थान रॉयल्स विरुद्ध डेल्ही कॅपीटल्स या संघांच्या टी – २० या IPL क्रिकेट सामन्यावर फोनद्वारे सट्टा घेऊन पैश्यांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळवीत असतांना आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना मेडशीचे सरपंच शेख जमीरभाई शेख गणीभाई (मुख्य आरोपी) याचे सांगण्यावरून त्याच्याकडे ३००/- रु. रोजाने सदर IPL सट्टा घेण्याचे काम करत असल्याचे सांगीतले. सदर आरोपींच्या ताब्यातून १ लॅपटॉप, १ AC, १ LED टि.व्ही., २ मोटारसायकल, १ फ्रिज, १ टेबल, ६ खुर्च्या, २ पेन ड्राईव्ह, १९ मोबाईल संच, १ कपाट, १ सेट ऑफ बॉक्स असा एकूण ४,६२,९४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर ०६ आरोपींवर पो.स्टे.मालेगाव येथे कलम ४, ५ मजुका सहकलम ६६ (सी), ६६ (डी) आय.टि. अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे (IPS), अपर पोलिस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि.प्रवीण धुमाळ, पोउपनि.रविकांत देशमुख, पोहवा.दिनेश काकडे, पोकॉ.समाधान इंगोले, दादाराव भोयर यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी, त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशीम
मो.8459273206