परमपुज्य चंदनबालाजी आणि परमपुज्य पद्मावतीजी म. सा. यांच्या प्रेरणा व संजय कोठारी यांच्या सल्पनेतुन स्वर्गीय संदेश कोठारी याच्या स्मरणार्थ उभारण्यात येत असलेल्या विहार धाम कामाचा शुभारंभ कोठारी फार्म हाऊस येथे मान्यवराच्या उपस्थित स्व संदेश कोठारी यांचे चिरंजीव आरुष कोठारी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे बंधु व जामखेडचे माजी सरपंच तथा प्रतिष्ठीत व्यापारी सुनिल कोठारी यांचे चिरंजीव स्वर्गीय संदेश कोठारी यांच्या अपघाती निधना नंतर त्यांच्या उठवणा दिवशी स्व. संदेश च्या स्मरणार्थ आपण एक विहार धाम बांधुन साथु संताची सोय करू अशी संकल्पना संजय कोठारी यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती त्या संकल्पने प्रमाणे आज विहार धामच्या प्रत्यक्ष कामास मान्यवराच्या उपस्थित श्रीफळ फोडून सुरवात करण्यात आली असुन पुढील काही दिवसातच विहार धामचे काम पुर्णत्वास जाईल असे यावेळी सुनील कोठारी यांनी स्पष्ट केले तसेच नगर पासुन निघाल्या नंतर जामखेड नगर रोडवर अशी विहार धामची व्यवस्था कुठेच नसल्याने येणाऱ्या साधु संताना रहाण्याची मुक्कामाची मोठी अडचण होत असे पर्यायी त्यांना शाळा अथवा इतर ठिकाणी रहावे लागत असल्याने संताची अव्हेलना होत असे त्यामुळे आता चार्तुमासा नंतर पायी प्रवास करणाऱ्या साधु संताची येथे उत्तम व्यवस्था होणार आहे सदर विहार धाम हि वास्तु हि जामखेड शहरापासून साधारण चार कि मी अतरावरील कोठारी फार्म हाऊस येथे उभारण्यात येत असून सर्व सोयी सुविधा युक्त अशी याची मांडणी एक हजार स्क्वेवर फुट मध्ये करण्यात येणार असुन सदर कामाचा स्लॅब पडला असुन लवकरच काम पुर्ण होऊन साधू संताच्या सेवे साठी सज्ज होईल असे कोठारी परिवाराच्या वतीने सांगण्यात आले
यावेळी साखर सम्राट अशोक चोरडिया, उद्योजक प्रविण छाजेड, संपतलाल बोरा, भुसार व्यापारी संघटनेचे माझी अध्यक्ष सुभाष भंडारी , युवा उद्योजक प्रफुल्ल सोळंकी, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, संकेत कोठारी ,राहुल राकेचा सह सर्व आप्त इष्ट मित्र व कोठारी परिवार उपस्थित होते