मुख्याध्यापक गिते
जामखेड :- जामखेड तालुका शिक्षण क्षेत्रात मागे राहिलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील डोणगाव येथील मूळ रहिवासी असलेले माननीय श्री बाळासाहेब धनवे यांचा अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला .खूप गरीब परिस्थितीत शिक्षण घेतले .पुढे ते शिक्षक म्हणून 1991 मध्ये याच तालुक्यात रुजू झाले. त्यांना या तालुक्यातील शिक्षणाची परिस्थिती अतिशय जवळून माहिती झाली. त्याच वेळेस त्यांनी अधिकारी होऊन जामखेड तालुक्यातील शैक्षणिक प्रगती उच्च पातळीवर नेण्याचा संकल्प केला.
पुढे त्यांनी परीक्षा देऊन शिक्षण विस्ताराधिकारी हे पद मिळवले. आणखी परीक्षा देऊन गटशिक्षणाधिकारी हे पद मिळवले. शिक्षक म्हणून संकल्प केला आणि तो परमेश्वराने पूर्ण केला. साहेब म्हणून ते 20 एप्रिल 2023 रोजी जामखेडलाच गटशिक्षणाधिकारी म्हणून हजर झाले.
त्यांच्या मनात एकच तळमळ होती ती म्हणजे जामखेड चा शैक्षणिक विकास, जामखेड तालुक्यातील गरीब घरातील मुले शिकले पाहिजेत या एकाच तळमळीने ते झपाटून गेले होते. तालुक्यात आल्यापासून त्यांनी एकच ध्यास घेतला. एक एक शाळा ते फिरू लागले. भेट देऊ लागले .
शिक्षकांना प्रोत्साहित करू लागले.
याचा परिणाम असा झाला की ,प्रत्येक शिक्षक कामाला लागले स्पर्धा परीक्षेला विद्यार्थी बसउ लागले. गुणवत्ता वाढू लागली नवोदय परीक्षेत तर नऊ शाळेचे नऊ विद्यार्थ्यांची निवड झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी देखील त्यांचे कौतुक केले. साहेबांचे सर्व स्तरातून कौतुक केले जाऊ लागले. त्यांनी सर्व मुलांचा ,त्यांच्या वर्गशिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ आयोजित केला जेणेकरून सर्वांनाच, प्रेरणा प्रोत्साहन दिले . चांगल्या कामाचे कौतुक करून त्याला वर्तमानपत्रात व सोशल मीडियावर प्रसिद्धी दिली .त्यामुळे समाजात शिक्षकाची प्रतिमा चांगली झाली .शिक्षकात कामासाठी चढाओढ निर्माण होऊन मैत्रीपूर्ण स्पर्धा निर्माण झाली. सर्व शिक्षक संघटनानी आपसातील मतभेद विसरून गटशिक्षणाधिकारी यांना मोलाची साथ दिली. शाळेच्या प्रत्येक स्नेहसंमेलनाला स्वतः उपस्थित राहिले शाळा पूर्वतयारी मेळावे यशस्वी केले.मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत सारोळा शाळेने जिल्ह्यातदुसरा क्रमांक घेऊन पाच लाख रुपयांची बक्षीस मिळवले. नुकताच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला या परीक्षेत हजारे हा विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला. एन एम एम एस परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.साहेबांनी क्षेत्रभेटी, सर्कस, ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. विविध प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडले व तालुक्याला एक दिशा दिली.
साहेबांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्हा परिषद शाळेचां पट देखील वाढला आहे. ते आल्यापासून जिल्हा परिषद शाळाकडे पाह ण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तालुक्यात तयार झाला आहे.
साहेबांनी अतिशय परिश्रम घेऊन तालुक्यामध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण केले आहे. तालुका भर फिरताना त्यांनी कोणाला बरोबर घेतले नाही एकटेच तालुका भर फिरत राहिले. शिक्षकांना प्रोत्साहन देत राहिले. विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन देत राहिले. पालकांनाही प्रोत्साहन देत राहिले.
या त्यांच्या शैक्षणिक चळवळीस ,परिश्रमास, तळमळीस माझा शतशः प्रणाम.
वैजनाथ फुलचंद गिते
मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा साकत
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी ,
एन् टी व्ही न्युज मराठी अहमदनगर
मो न 9765886124