फुलचंद भगत
वाशिम:-महाराष्ट्र शासन द्वारे कारंजा उपजिल्हा रुग्णालयात जनसामान्य व गरीब पीड़ित रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी डायलेसिस सेंटर उभारण्यात आले आहे,परंतु सदर डायलेसिस सेंटर अजूनपर्यंत सुरू न झाल्याने पीडित रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे,ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो यूसुफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात ०१ ऑगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांना निवेदन देऊन त्वरित डायलेसिस सेंटर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे,या मागणीचे निवेदन अधीक्षक यांना देण्यात आले,यावेळी राकांपा अल्पसंख्यक जिल्हा कार्याध्यक्ष जाकिर शेख,पूर्व गुटनेता अड़ फ़िरोज शेकुवाले, नगरसेवक सलीम प्यारेवाले,अ एजाज अ मन्नान,सलीम गारवे,राकांपा शहर कार्याध्यक्ष नदीम राज, शारिक शेख,शकील नौरंगाबादी,आकिब जावेद,यूसुफ खान मौलाना, श्याम घोडेस्वार, शहबाज खान,मोहसिन शेख,तौसीफ अकबानी, सलमान वीरानी,जुनेद शा,मुजफ्फर शेख,हाफीज राज यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *