अहमदनगर शहरात असलेले नीलक्रांती चौक येथे दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुरज हरिभाऊ साळवे राहणार सर्जेपुरा व सनी अनिल काते राहणार वैदुवाडी या दोन तरुणांवर रात्री अकराच्या दरम्यान निल क्रांती चौक येथे हल्ला करण्यात आला आहे सदरच्या या हल्ल्यामध्ये दोन्ही तरुण जखमी झाले आहे नेमका हा हल्ला कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आले नाही तर जखमी तरुणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तोफखाना पोलिसांनी धाव घेतली आणि हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.