पारनेर व नेवासा परिसरातील अवैध दारू व जुगार अशा पाच ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छापे टाकले. यात पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर त्यांच्याकडून ३२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार ही कारवाई झाली. यात पारनेर तालुक्यातील निघोज येथे दोन अवैध दारू विक्री ठिकाणांवर तर नेवासा तालुक्यातील नेवासा शहरात असलेल्या दोन व मुकींदापूरमधील एका जुगार अड्ड्यावर छापे टाकण्यात आले.
