फुलचंद भगत
वाशिम :- संपत्तीच्या वादातुन अनेक मोठमोठ्या घटना घडल्या असुन मर्डरही झाल्याचे ऐकले अशीच खबळजनक घटना वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात घडली असुन नातानेच आजीआजोबाला संपवल्याचा थरार घडला असुन याप्रकरणी पोलीसांनी चौघांना अटक केली आहे. मानोरा मंगरुळपीर रोड लगत राहणारे प्रल्हाद दत्तराम वीर (अंदाजे वय ७० वर्ष) व निर्मलाबाई प्रल्हाद वीर (अंदाजे वय ६५) या दोघांचा संपत्तीच्या वादातून दि. ४ ऑगस्ट रोजी राहत्या घरी चौघांनी काटा काढल्याची घटना घडली.
आजी आजोबाचा काटा काढणारा खुनाचा नातूच सुत्रधार; चार आरोपींना अटक
सुञाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार आजी, आजोबा दोघांचा खून केल्यावर त्यांचे मृतदेह आरोपी नातू प्रतीक संतोष वीर, जगदीश अनिल देवकर शिवाजी नगर मानोरा, जिवन फडके विठोली, विकास भगत डोंगरगाव या चौघांनी इंझोरी नजिक असलेल्या अडाण धरणात फेकले. मृतक प्रल्हाद वीर यांचे शव ६ ऑगस्ट रोजी अडाण धरणात मिळून आले. तर मृतक निर्मलाबाई वीर यांचे मृतदेहाचा शोध आरोपींनी खून करण्याची कबूली दिल्यावर अडाण धरणात बचाव पथकाद्वारे पोलीस यंत्रणेचा शोध सुरू असताना गुरुवारी दि. ८ ऑगस्ट रोजी सापडला. सदरील खुनाचा प्रकरण उलगडा पोलीस अधीक्षक अनुज तारे व अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, एल सी बी चे पोलीस निरीक्षक महल्ले, ए पि आय योगेश धोत्रे, ठाणेदार शिंदे, सहाय्यक ठाणेदार अल्ल्लापुरकर, पि एस आय नागरे, बारे, पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण, मयुरेश तिवारी यांनी केला.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम