सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत अॅड सचिन दरेकर हे पहिल्याच प्रयत्नांत पात्र ठरले. सदर परीक्षेत राज्यात फक्त 6.66% विद्यार्थीच पात्र ठरले. तसेच जुलै महिन्यात झालेल्या एल एल एम (मास्टर ऑफ लॉ) परीक्षेत सुद्धा अॅड दरेकर यांनी 9.63 CGPA सह न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथून प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य व सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत च्या वतीने उपसरपंच जालिंदर जाधव, सदस्य निवृत्ती कर्डिले, सुशील तापकिरे तसेच विविध कार्यकारी सोसायटी बुऱ्हाणनगर तर्फे व्हॉईस चेअरमन सागर भगत यांनी त्यांचा सत्कार केला.
