बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या (ता. २४) बंद पुकारला होता. या बंद विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीने पुकारलेला बंद बेकायदेशीर आहे, अशा संवेदनशील घटनाबाबत कोणीही बंद पुकारू शकत नाही, असे म्हटले आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला, तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. महाधिवक्ता देवेंद्रकुमार उपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाचे हे आदेश दिले आहेत. मुंबई हायकोर्टाच्या या आदेशानंतर पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस जारी करण्यात येत आहे.