सावेडी उपनगरातील सपकाळ चौकात सोपान मुळे यांचा त्यांचा भाऊ शुभम मुळे याने खून केला आहे. या प्रकरणी आरोपी शुभम मुळेला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


सावेडीतील सपकाळ चौकाजवळ असलेल्या भिंगारदिवे मळ्यात काल (सोमवारी) रात्री सोपान व शुभम या दोन भावांमध्ये वाद झाले. यात लहान भाऊ असलेल्या शुभमने सोपानवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात सोपान गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी सोपानला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी शुभमवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले.