अहमदनगर येथील मेहेकरी येथे जमिनीच्या वादावरून पाच ते सहा लोकांनी रतन चंद्र कानडे व रंभा शहादेव जावळे यांना काही लोकांनी बेदम मारहाण केली रतन कानडे व रंभा जावळे यांची मेहकरी येथील गट नंबर. २५० येथे जमीन आहे ते दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान जेसीबीच्या साह्याने शेत जमिनीची साफसफाई करत असताना १. साहेबराव चंदर कानडे, २. सुर्यभान चंदर कानडे, ३. नंदु साहेबराव कानडे, ४. दादु दशरथ कानडे, ५. चंद्रकांत कानडे, ६. भाऊसाहेब सुर्यभान कानडे सर्व रा. मेहकरी ता.जि. अहमदनगर तेथे आले व म्हणाले की ही जमीन आमची आहे तुम्ही येथे कसे काय आला तुमचा येथे काहीही संबंध नाही असे सांगून त्यांच्यावर दगडांनी तसेच लाथा बुक्क्यांनी दोघास बेदम मारहाण केली याबाबत लेखी तक्रार कानडे यांनी पोलीस अधिक्षक साहेब यांना दिला.
प्रतिनिधी- अबरार शेख
मो.८८०६३३६६००
N Tv News Marathi

