- जामखेड तालुक्यातील बावी येथे भव्य नामकरण फलकाचा लोकार्पण सोहळा संपन्न.
- स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा वारसा जपत चौकाला नवी ओळख.
- सकल हिंदू समाज आणि स्थानिक तरुणांच्या पुढाकाराने भगव्या वातावरणात सोहळा.
- ‘भगवं वादळ’ ग्रुप आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ‘जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
AHILYANAGAR | जामखेड तालुक्यातील बावी येथे ‘हिंदू धर्मरक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज चौक’ फलकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून, या सोहळ्यामुळे बावी ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराला आता एक नवी आणि देदीप्यमान ओळख मिळाली आहे.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, महापराक्रमी धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा आणि शौर्याचा वारसा जपत, १० मे २०२६ रोजी या भव्य नामकरण फलकाचे लोकार्पण करण्यात आले. जामखेडवरून बावी गावात प्रवेश करताना, बस स्टॉपजवळ असलेल्या नान्नज आणि फक्राबादकडे जाणाऱ्या मार्गावरील भगव्या ध्वजस्तंभाच्या शेजारी हा सोहळा पार पडला. सकल हिंदू समाज, बावी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात गावातील शेकडो तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
या लोकार्पण सोहळ्यासाठी मार्गदर्शक म्हणून बलभीम मुरूमकर सर, बाळासाहेब पवार सर, जगन्नाथ पवार सर उपस्थित होते. तसेच सरपंच महादेव कारंडे, गणेश पवार पाटील, नितीन शेरे, प्रथमेश बिरंगळ, कुणाल चिकणे, प्रथमेश चिकणे, अशोक (पप्पू) निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे महानिवेदक हनुमंत महाराज निकम यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात पत्रकार अमृत कारंडे, रवींद्र पवार (दगडू तात्या), अंगद कारंडे, अशोक बिरंगळ, अनिल कारंडे, विकास मधुकर पवार, पप्पू अरुण पवार, आकाश पवार, सनी मंडलिक यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘भगवं वादळ’ ग्रुपचे सर्व सदस्य आणि ‘हनुमान चालीसा साप्ताहिक मिलन’ परिवारातील तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. अत्यंत शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने बावी गावातील सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवले आहे.
नंदु परदेशी, अहिल्यानगर
