राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद झाल्याच्या दाव्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात आपल्याकडे सध्या कोणतीही माहिती नसून, एक दिवस द्या, तपासून सांगतो, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने ३६ हजार कंपन्या बंद झाल्याचे सांगितले असले तरी महाराष्ट्राची स्थिती तपासावी लागेल, असे उदय सामंत म्हणाले. केंद्र सरकारला चुकीचे ठरवत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उषा चव्हाण यांनी सरकारवर केलेल्या टीकेवर बोलताना, आपण स्वतः चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांची समस्या जाणून घेऊ, असे सामंत यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नाराजीबाबतही त्यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करू, असे सामंत म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केले असल्याचे सांगत, आतापर्यंत किती लोकांना जात प्रमाणपत्र देण्यात आले याचा अहवाल जरांगे पाटील यांना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
