चिमूरमध्ये ‘क्रांतीज्योत दौड स्पर्धा-२०२६’ मोठ्या उत्साहात पार पडली. ग्रामगीता महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत पुरुष, महिला आणि १२ ते १७ वर्षे वयोगटातील मुले-मुली अशा चार गटांत एकूण २६२ धावपटूंनी सहभाग घेतला.

स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुनंदा एस. आस्वले यांच्या उपस्थितीत झाले. क्रीडा संचालक डॉ. संदीप बी. सातव हे कार्यक्रमाचे समन्वयक होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र वंजारी, डॉ. हलगे आणि इमरान शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुरुष खुल्या गटात अजित उके प्रथम, नुमान शाह द्वितीय आणि भूषण आस्वले तृतीय ठरले. महिला खुल्या गटात अंजली मडावी प्रथम, समीक्षा भोयर द्वितीय आणि नम्रता लोनबले तृतीय ठरल्या.

१२ ते १७ वर्षे मुलींच्या गटात रुचिका नागरकर, खुशी पिंपळशेंडे आणि श्वेता चौधरी, तर मुलांच्या गटात शिवम बुढे, हितांशू मिलमिले आणि सनी प्रजापती यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.

प्रत्येक गटातील विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. चौथ्या ते आठव्या क्रमांकाच्या धावपटूंना मेडल व प्रमाणपत्र, तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *