यावल तालुक्यातील दहिगाव येथे ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या गणरायाला आज दिनांक २७ रोजी तेराव्या दिवशी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. दुपारी गावातील प्रमुख मार्गांवरून भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली. मिरवणूक मार्गावरील अडीअडचणी दूर कराव्यात आणि गुलाल न उधळता शांततेत मिरवणूक पार पाडावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी कार्यकर्त्यांना केले.

गुलाल हा केवळ कपाळाला टिळा लावण्याचे प्रतीक असून तो उधळू नये, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. विसर्जनासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

बैठकीत माजी ग्रामपंचायत सदस्य मुक्तार का पठाण आणि देविदास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी उपसरपंच गुलाब चौधरी, शैलेंद्र पाटील, मयूर पाटील, पुंडलिक पाटील, हरिभाऊ पाटील यांच्यासह शांतता समिती सदस्य, सहायक फौजदार विजय पाचपोळ, मोहन तायडे, जनार्दन महाजन आणि होमगार्ड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *