यावल येथील कुंभार समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते विजय देविदास पंडित यांची कुंभार समाज सामाजिक संस्था, जळगावच्या यावल तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे समाजबांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.
जळगाव येथील पिंप्राळा समाज मंदिरात कुंभार समाज सामाजिक संस्थेची बैठक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सचिव सखाराम मोरे, उपाध्यक्ष सुभाष पंडित, संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आणि जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंभार समाज संस्थेला बळकटी देण्यासाठी तसेच समाजहिताच्या दृष्टीने सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विजय देविदास पंडित यांची यावल तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात येत असल्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी निवडपत्रात म्हटले आहे.
विजय पंडित यांच्या निवडीचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह कुंभार समाजबांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.
