Ancor:- गोंदिया जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई केली आहे. गोरेगाव तालुक्यातील भंडगा येथे एका महिलेच्या घरातून विक्रीसाठी साठवलेला 934 ग्रॅम गांजा व मोबाईल असा 1 लाख 3 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने गोरेगाव हद्दीत 11 जून रोजी ही कारवाई केली. गुप्त माहितीवरून भंडगा येथील पुष्पा उर्फ मंगला मोतीराम मोजे वय 52 हिच्या घराची झडती घेतली असता, पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत 934 ग्रॅम गांजा आढळला. याची किंमत 93,400 रुपये आहे. सोबतच 10 हजाराचा मोबाईलही जप्त केला गेला आहे. चौकशीत आरोपी महिलेने हा गांजा गोंदियातील दोन इसमांकडून विकत घेतल्याचे सांगितले. तिच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धिरज राजुरकर, पोलिस हवालदार दिक्षीतकुमार दमाहे, सुबोध बिसेन, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन व पथकाने केली.

प्रतिनिधी मुकेश खरोले गोंदिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *