पावसाचे प्रमाण कमी असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर सावनेर तालुक्यातील माळेगाव टाऊन येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
मृद व जलसंधारण विभागांतर्गत असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची सद्यस्थिती, पाणीसाठा, आवश्यक दुरुस्ती आणि परिसरातील शेतकऱ्यांना होणारा लाभ याबाबत आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
पाहणीदरम्यान बंधाऱ्यातील उर्वरित निडल्स बसविण्याबाबत तसेच नाल्याचे खोलीकरण करण्याबाबत त्यांनी विचारणा केली. यावेळी उपअभियंत्यांनी आवश्यक निडल्स बसविण्यात येतील आणि नाल्याचे खोलीकरण करण्यात येईल, अशी माहिती दिली.
नाल्याचे खोलीकरण आणि निडल्स बसवल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढण्यास, पाण्याचा योग्य प्रवाह राखण्यास तसेच जलसंधारण अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास आणि भूजल पातळी सुधारण्यास हातभार लागणार आहे.
आमदार डॉ. देशमुख यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी विधानपरिषद आमदार राजीव पोतदार, उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार डहाट, कु. श्रद्धा हटवार, उपअभियंता हितेश महाजन, कनिष्ठ अभियंता, सरपंच प्रतिभाताई गायकवाड, उपसरपंच अमोल फिरके, वैभव ढवळे अन्य उपस्थित होते.
मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर
