नागपूर जिल्ह्यातील वाकोडी येथील सुप्रसिद्ध डहाका वादक व गायक श्री. यादवरावजी कन्होलकर गुरुजी आणि सहकाऱ्यांनी आकाशवाणी नागपूरच्या अस्मिता वाहिनीवर डहाका जागराची सुरेल प्रस्तुती केली. श्रावण मास आणि शिक्षणावर आधारित गीतांचे यावेळी गायन करण्यात आले.

यादवरावजी कन्होलकर गुरुजी यांच्यासह शेषरावजी नरुले, ज्ञानेश्वरजी चौधरी, कुमारी अनुष्का दीदी भुते आणि रितिकजी शिंदे यांनी डहाका जागर सादर केला. या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग आकाशवाणी संचालिका मोनालीताई शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपादित करण्यात आले.

श्रावण मास तसेच शिक्षणावर आधारित गीतांचे गायन करण्यात आले. हा डहाका जागर मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

प्रतिनिधी मंगेश उराडे | एनटीव्ही न्यूज मराठी | नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *