फुलचंद भगत
वाशिम:– दिनांक २८/०८/२०२४ रोजी मा.जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्र्वरी एस. यांच्या निर्देशानुसार व मा.निवासी उप जिल्हाधिकारी श्री विश्वनाथ घुगे सर यांचे सूचनेनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ,वाशिम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना आग लागल्यास ती अग्निशमन यंत्राने कशी विझवावी या बाबत प्रात्यक्षिक देण्यात आले.
अग्निशमन यंत्र कसे हाताळावे, अग्निशमन यंत्राची ओळख याबाबत विस्तृत मार्गदर्शन अग्निशमन दलाचे अधिकारी श्री अक्षय तिरपुडे व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांचे सह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षणाला उपस्थित होते.
